उस्मानाबाद :- भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने 30 मे, रोजी सकाळी 11-30 वाजता टेलिफोन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दुरध्वनी ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असून ग्राहकांनी तीन महिन्यापेक्षा जास्त असेलली प्रलंबित असणा-या देयके, नवीन टेलिफोन जोडणी, टेलिफोन बसविण्याचे साहित्य पुरविण्यास होणाऱ्या विलंबाबाबतच्या तक्रारी, टेलिफोनच्या सेवाबाबत काही तक्रारी असल्यास त्या त्यांनी लेखीस्वरुपात 23 मेपर्यंत बीएसएनएलच्या सांजा रोड येथील कार्यालयात पाठवाव्यात. तक्रारी पाठविताना स्वत:चे नाव व पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक नमूद करावा, असे आवाहन उपमंडळ अभियंता (वाणिज्य), बीएसएनएल, प्रशासनिक भवन, सांजा रोड, उस्मानाबाद यांनी केले आहे.
टेलिफोन विभागातर्फे ग्राहकांसाठी 23 रोजी खुले चर्चासत्र
उस्मानाबाद :- भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने 23 मे, रोजी सकाळी 11-30 वाजता टेलिफोन ग्राहकांसाठी खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात ग्राहकांना (बीएसएनच्या) च्या विविध योजनांची सांगोपांग चर्चा करुन बीएसएनएल बाबतच्या त्यांच्या वैयक्तिक तक्रारी स्वीकारण्यात येतील याची संबंधितांनी नेांद घ्यावी, असे आवाहन उपमंडळ अभियंता (वाणिज्य), बीएसएनएल, प्रशासनिक भवन, सांजा रोड, उस्मानाबाद यांनी केले आहे.