उस्मानाबाद :- जिल्ह्यात प्रशासनाने 34 छावण्यांना मंजुरी दिली असून त्यापैकी 27 छावण्या कार्यान्वित झाल्या असून त्यावर 8 कोटी 5 लाख इतका खर्च झाला आहे. या छावण्यांमध्ये सध्या 42 हजार 209 इतकी जनावरे आहेत.
      जिल्ह्याच्या ज्या भागात विविध संस्था अथवा संघटनांकडून मागणी आली, त्याठिकाणी चारा छावण्या सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. सध्या भूम तालुक्यात 19 चारा छावण्यांना मंजुरा दिली असून त्यापैकी 17 कार्यान्वित झाल्या आहेत. या ठिकाणी सध्या लहानमोठी 17 हजार 133 जनावरे असून त्यासाठी प्रशासनाने 7 कोटी 34 लाख रुपये खर्च केले आहेत. कळंब तालुक्यात मंजूर 10 पैकी 5 छावण्या सुरु असून तेथे 2 हजार 274 जनावरे आहेत. तेथे 38 लाख 97 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.उमरगा तालुक्यात 2 छावण्या कार्यान्वित असून तेथे 986 जनावरे आहेत. याठिकाणी 10 लाख रुपये इतका खर्च या चारा छावण्यांवर झाला आहे. तुळजापूर तालुक्यात तीनही मंजूर छावण्या कार्यान्वित असून तेथे 1 हजार 816 जनावरे आहेत. याठिकाणी 21 लाख 13 हजार इतका खर्च झाला आहे.
      जिल्ह्यात या व्यतिरिक्त विविध सेवाभावी संस्थांकडूनही चारा छावण्या चालविण्यात येत आहेत. यांत उमरगा, लोहारा, परंडा आणि कळंब  तालुक्यात प्रत्येकी एक आणि तुळजापूर तालुक्यात दोन चारा छावण्या सुरु झाल्या असून या सर्व छावण्यांमध्ये 2 हजार 465 इतकी जनावरे आहेत.      
 
Top