उस्मानाबाद :- आगामी काळात जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन निधीतून सर्व शासकीय इमारतींवर पाऊस पाणी संकलन (रेन वाटर हार्वेस्टींग) केले जाणार आहे. नावीन्यपूर्ण योजनेंतर्गंत त्यासाठी खास तरतूद केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून डॉ. के.एम. नागरगोजे यांनी सन 2012 या वर्षीचा कमी पाऊस लक्षात घेऊन नोव्हेंबर महिन्यापासूनच पाऊस पाणी संकलनाबाबत जागृती करण्यासाठी मोहिम हाती घेतली होती. हिवरे बाजारचे सरपंच आणि आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे पाणीबचती संदर्भातील तालुकावार कार्यशाळांचे आयोजन जिल्ह्यात करण्यात आले. चेन्नई येथील रेन सेंटरचे संचालक डॉ. राघवन यांचे रेन वाटर हार्वेस्टींग या विषयावर व्याख्यानेही आयोजित करण्यात आली. स्थानिक स्वयंसेवी संस्थांची मदतही यासाठी घेण्यात आली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तालुकावार बैठका घेऊन पाणीबचत आणि पाऊस पाणी संकलनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या कालावधीत केला.
या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून तुळजापूर नगर परिषद क्षेत्रामध्ये 25 खासगी इमारतींवर पाऊस पाणी संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी अजून 50 खाजगी इमारतीवरील काम सध्या प्रगतीपथावर आहे. उस्मानाबाद, परंडा या शहरांमध्येही आता पाऊस पाणी संकलन आणि जल पुनर्भरणाचे उपक्रम हाती घेतले जात आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाऊस पाणी संकलन आणि जलपुनर्भरणाचे महत्व पटवून दिले जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महावितरण यांची कार्यालये तसेच अन्य विस्तारित इमारत असणा-या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बॅंका तसेच व्यापारी गाळे आदींनाही यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
पावसाचे पाणी हे पिण्यासाठी अतिशय शुद्ध आणि नैसर्गिक असते. इतर कोणत्याही स्त्रोतांपेक्षा ते आरोग्यास हितकारक असते. त्यामुळे पाऊस पाणी संकलन फायदेशीर असते ही बाब जनजागृतीद्वारे मांडली जात आहे. त्याचा दृश्य परिणाम येत्या पावसाळ्यात दिसेल, अशी अपेक्षा आहे.