उस्मानाबाद :- तुळजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मागासवर्गीय  व आर्थिक द्ष्टया मागासवर्गीय (मुलांचे) शासकीय वस्तीगृह, तुळजापूर येथे  कार्यरत आहे. या वसतीगृहात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरीता मुलांना  प्रवेश देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ व आर्थीकदृष्टया मागासवर्ग विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी सामाजिक न्याय विभागाच्या https.//mahaeschol.maharashtra.gov.in  या संकेतस्थावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन गृहपाल, तुळजापूर यांनी केले आहे.
    इ. 8 वी, 11 वी, बी. ए, बीसीए, बीकॉम-भाग-1, तंत्रनिकेतन भाग-1, अभियांत्रिकी पदवी भाग-1, डी. एड. भाग-1, आय. टी. आय भाग-1, विद्यार्थ्यांनी  प्रवेश अर्ज भरावेत. विद्यार्थ्यांच्या पालकांचे सन 2012-13 या वर्षाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख असल्याचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक असून  गुणपत्रिका, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तहसीलदार यांनी दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी वसतीगृहाच्या नोटीस बोर्डावर लावून संबंधित विद्यार्थ्यांना तसे कळविण्यात येईल.
     वसतीगृहात निवास, भोजनाची ,स्टेशनरी साहित्य, गणवेश आदि विनामुल्य पुरविण्यात येणार आहे. याशिवाय शैक्षणिक साहित्य, दरमहा 500 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येतो. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत गृहपाल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय  (मुलांचे) शासकीय वस्तीगृह, तुळजापूर येथे संपर्क साधावा.
 
Top