सोलापूर -: येत्या शैक्षणिक वर्षात दहावीचा गणिताचा पेपर 150 ऐवजी 100 गुणांचा करण्यात आल्याने बीजगणित आणि भूमितीच्या पाठय़पुस्तकातील काही उपघटक कमी झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होणार असून, दहावीची परीक्षा आता आणखी सुलभ होणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही याचे प्रकटन जाहीर झाले आहे. विद्यार्थ्याचा कस बघणारे बरेच उपघटक कमी झाल्याने प्रश्नपत्रिकासुद्धा आता सुटसुटीत होणार असून विद्यार्थ्यांवरचा ताण हलका होण्यास मदत होणार आहे. याबाबत विस्तृत माहिती शाळांना कळवण्यात येणार असून येत्या शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यंदा दहावीचे विज्ञान आणि गणित वगळता सर्व पाठय़पुस्तके बदलली आहेत. गणिताची परीक्षा 100 गुणांची होणार असल्याचे नक्की कोणते उपघटक वगळले जातात, याची उत्कंठा विद्यार्थी आणि पालकांना होती.
बीजगणितातील बदल :- दहावीच्या बीजगणिताच्या पहिल्या प्रकरणामधील भूमितीय र्शेष्ठी (जॉमेट्रिक प्रोग्रेशन), अंकगणितीय मध्य आणि भूमितीय मध्य(ऍरिथमेटिक आणि जॉमेट्रिक मीन) हे भाग आणि त्या संबंधीचे सर्व घटक वगळण्यात आले आहेत. संभाव्यता (प्रॉबॅबिलिटी) या प्रकरणामधील बेरजेचा गुणधर्म हा भाग वगळण्यात आला आहे. तर सांख्यिकी 2 (स्टॅटिस्टिक्स) मधील आयातालेख (हिस्ट्रोग्राम) काढून मध्यक (मीन) आणि बहुलक (मोड) तसेच संचित वारंवारता वक्र (ओग्रीव्ह) आदी भाग नव्या रचनेत वगळण्यात आला आहे.
गुणोत्तर, प्रमाण, चलन घटक नसणार :- गुणोत्तर आणि प्रमाण (रेशो एण्ड प्रोपोरशन) मधील चलन (व्हेरीएशन) उपघटक नसणार आहे. तर सांख्यिकीमधील आयातालेख आणि वारंवारता बहुजाकृती (हिस्टोग्राम आणि फिक्वेन्सी पॉलिगॉन) हे आलेख काढण्यात आले आहेत. भूमितीच्या रेषा आणि कोन प्रकरणातून षष्ठीमान कोनमापनाची पद्धती अभ्यासक्रमात नसणार आहे. भौमितिक रचनांमधील त्निकोनाचा पाया त्यासमोरील कोन आणि उरलेल्या दोन बाजूंची बेरीज किंवा फरक दिला असताना त्निकोन काढणे या रचना वगळण्यात आल्या आहेत.
नववीच्या पुस्तकातील उपघटकही वगळले :- सरत्या शैक्षणिक वर्षात नववीची परीक्षा 100 गुणांची होती. परंतु कोणतेही उपघटक पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण होता. यंदा मात्न नववीच्या पुस्तकातील जास्तीचे उपघटक वगळण्यात आले असून ती माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार बीजगणिताच्या संच या प्रकरणातील डी मॉर्गनचा नियम आणि दोन संचातील फरक काढणे हा भाग वगळला आहे.
भूमितीतील बदल :- भूमितीच्या समरूपता या प्रकरणातून प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, पायथागोरसचे प्रमेय व्यत्यास आणि 30, 60, 90 कोन असलेल्या त्रिकोनाच्या प्रमेयांचा व्यत्यास वगळला आहे. वर्तुळ (सर्कल) मधील चक्रीय चौकोन (सायकलिक कॉड्रीलॅटरल) या प्रमेयाचा व्यत्यास आणि स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा व्यत्यास हा डोकेदुखी असणारा भागही वगळण्यात आला आहे.
प्रमेयही वगळली :- महत्त्वमापन (मेन्सुरेशन) प्रकरणातील सुसम बहुभुजाकृतीचे (रेग्युलर पॉलिगॉन) क्षेत्रफळ काढणे हा त्यातल्या त्यात कठीण असणारा भाग वगळला आहे. एकरूप त्रिकोणमधील 30, 60, 90 कोनांचे प्रमुख तसेच रेषाखंडाचा लंब दुभाजक (परपेन्डीक्युलर बायसेक्टर) आणि कोन दुभाजक (ऍन्गल बायसेक्टर) ची प्रमेय वगळली आहेत.
गुणांचे वर्गीकरण :- मार्च 2014 मध्ये होणारी गणिताची परीक्षा बीजगणित 40, भूमिती 40 आणि अंतर्गत 20 गुण अशी 100 गुणांची आहे.

(साभार : दिव्यमराठी)