संग्रहित छायाचित्र
    मराठवाडा दुष्‍काळाच्‍या झळा सहन करता करता नाकी नऊ झाला. पण दुष्‍काळ संपेना? दुष्‍काळाच्‍या नावाखाली सर्वच राजकीय पक्षांनी आपआपली पोट भरण्‍याचे षडयंत्र स्‍वताःहून केले ते सर्व उघड्या डोळ्यांनी जनतेने पाहिले. सध्‍याचा दुष्‍काळ हा डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी मोठ-मोठ्या सभा घेतल्‍या. मदतीसाठी आवाहन केले, सरकारने तुटपुंजी मदत दिली. काही जनतेपर्यंत पोहचली? तर काही पुढा-यांच्‍या महलात गेली?
    उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात दुष्‍काळी प्रश्‍नांवर अनेकांनी सरकारच्‍या विरोधात रान उठवले. चारा छावणी, पाण्‍यासाठी टँकर योजना, मजुरांच्‍या हाताला काम आदी मुद्यावर विरोधी पक्ष व कार्यकर्ते यांनी सरकारी यंत्रणेला धारेवर धरले. उपोषण, आंदोलन, धरणे आदी मार्गाने सरकारवर दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न झाला.
    उस्‍मानाबादला उजनीचे पाणी हे कित्‍येक वर्ष ‘भिजत पडलेले घोंगडे’ आता प्रश्‍न सुटला, पण ‘पाणी शहरात आणले’ याचे खरे श्रेय कोण घ्‍यायचे यासाठी सत्‍ताधारी व विरोधी पक्ष जनतेला वेठीस धरुन विविध मंत्री, संत्री जिल्‍ह्यात आणून शक्‍ती प्रदर्शन करीत असल्‍याचे सर्वश्रूत आहे. पाण्‍याचा प्रश्‍न कोणाच्‍या प्रयत्‍नांमुळे मिटला? यासाठी कोणाचे योगदान जास्‍त आहे? एखादी गोष्‍ट थोडीफार मार्गी लागली की, ती माझ्या प्रयत्‍नांमुळेच घडली, अशी टिमकी मिरवणा-या राजकीय पुढा-यांची, नेते मंडळींची संख्‍या उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात तशी जास्‍तच आहे, असे म्‍हणणे वावगे ठरणार नाही, हे जनतेलाही माहिती आहेच.
    मराठवाड्याच्‍या दुष्‍काळी प्रश्‍नावर मुख्‍यतः हा सर्वच वर्तमान पत्रांनी परखडपणे दुर्गम भागातली स्थिती बातम्‍याद्वारे मांडली. तेंव्‍हा कुठे सरकारी यंत्रणा हलली, सर्वच राजकीय पक्षांचे नेते दौरे करायला लागले. हा प्रश्‍न सुटावा यासाठी धडपडायला लागले. पण हा दुष्‍काळ किती गंभीर आहे. याची माहिती लोकशहीचा चौथा खांब म्‍हणवणा-या वर्तमान पत्रामुळेच समोर आली. त्‍या सर्वच वर्तमान पत्रांना पत्रकार, संपादक, वार्ताहर, बातमीदार, छायाचित्रकार यांना क्रांतीकारी सलाम…!
    सत्‍ता नाही, संपत्‍तीचा मोह नाही, अहंमगंड नाही, फक्‍त आणि फक्‍त समाजसेवेसाठीच आपला जन्‍म झाला आहे, असे मानून सर्वांना सोबत घेऊन अनेकांचे प्रश्‍न सोडवणारा, मुक्‍या जनावरांना, पाणी, चारा, ऊन, वारा यापासून आसरा देणारा (लोकसहभागातून) गरीबांचे अश्रू पुसताना एक दुरदृष्‍टा कार्यकर्ता भूम-परंडा-वाशी या मतदार संघातील 1500 लोकवस्‍तीच्‍या हाडोंग्री गावात राहून सामाजिक उन्‍नतीचे स्‍वप्‍न पाहणारा नेता म्‍हणजे ‘बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर’ हे होय. संबंध दुष्‍काळामध्‍ये एकदिवसही सुखाने झोप नाही का? वेळेवर पोटाला अन्‍न नाही, स्‍वतःची 300 गायी व परिसरातील 4000 मुक्‍या जनावरांचा आश्रयदाता म्‍हणून प्रचंड कष्‍ट, शासनाच्‍या मदतीची वाट न पाहता दुष्‍काळग्रस्‍त भागासाठी ‘चारा छावणी’ उभी केली. छावणीवर जनावरांना मुबलक चारा, पाणी पुरवले आणि ऊन, वादळ वारा यापासून त्‍यांना सरंक्षणही दिले. जनावरांच्‍यासोबत राहिलेल्‍या माणसांच्‍या हाताला मजूर संस्थेमार्फत रोजगार उपलब्‍ध करुन दिला. गायींचे दुध इतरत्र कुठेही न घालता शेतक-यांना हमी भाव देणा-या ‘वारणा दूध’ संघालाच दूध घातले. सर्वांना समान मोबदला मिळवून दिला. चारा छावणी चालवत असताना दिवसभर काम करुन थकलेल्‍या शेतक-यांना रात्री भजन, किर्तन, आराधी मंडळाची गाणी, विविध प्रश्‍नांची उखल करणारी व्‍याख्‍याने आदी उपक्रम राबवले.
    हाडोंग्री हे गाव सर्वप्रथम बाळू काकांनी टँकरमुक्‍त केले. पाण्‍याचे व्‍यवस्थित नियोजन केल्‍यामुळे आज प्रत्‍येक घराला पुरेल एवढे पाणी गावातच उपलब्‍ध केले. गावातील जिल्‍हा परिषद असो किंवा भगवंत विद्यालय असो मुलांना परिपूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी काका प्रयत्‍नशील आहे.. बाळू काकांचे  MSC कृषी हे अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण झाले असल्‍यामुळे त्‍यांनी शेतीमध्‍ये अनेक शेतक-यांच्‍या हिताचे प्रयोग राबवले आणि यशस्‍वीही करुन दाखवले आहोत.
    उस्‍मानाबाद जिल्‍हा परिषदचे अध्‍यक्ष असताना त्‍यांनी अनेक विकासाभिमुख योजना आखल्‍या व राबवल्‍या. विशेषतः अपंगाना मदत, नैसर्गिक आपत्‍ती काळात मदत, गोरगरीब कष्‍टकरी बहुजनांना आरोग्‍यासाठी  मदत त्‍यांनी स्‍वतःहून केली आहे.
    भगवंत सामाजिक संस्‍थेमार्फत बाळू काका व त्‍यांच्‍या सहकारी मित्रांनी नुकताच 101 सर्वधर्मीय विवाह सोहळा 60,000 (साठ हजार जनसमुदायांच्‍या साक्षीने) घडवून आणला. फक्‍त दुष्‍काळी भाग खर्च कमी व्‍हावा, पाण्‍याची सोय व्‍हावी, लोकांच्‍या पोटात चांगले रूचकर पोटभर अन्‍न जावे, गोरगरीबांचे पैसे वाचावेत, या हेतूने हा विवाह सोहळा मोठ्या थाटाने पार पाडला. बाळू काकांना 101 नवविवाहित जोडप्‍यांचे तर आशिर्वाद लागतीलच पण 60 हजार जनसमुदायाचेही लागतील यात शंकाच नाही.
    बाळासाहेब पाटलांची राजकीय कारकीर्द 1997 पासून जि.प. सदस्‍य निवडणुकीपासून सुरु झाली ते कॉंग्रेस पक्षांचे निष्‍ठावान कार्यकर्ते म्‍हणून भूम-परंडा-वाशी मतदार संघातच नव्‍हेतर संबंध महाराष्‍ट्राला परिचित आहेत. त्‍यांचे मोठे बंधू शंकरराव पाटील हे सध्‍या कॉंग्रेस पक्षाचे जिल्‍हा सरचिटणीस आहेत. त्‍यांच्‍याकडून प्रेरणा घेऊन बाळू काकांनी राजकीय प्रवास सुरु केला. 1999 मध्‍ये भूम-परंडा-वाशी विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्‍हणून लढवली. फक्‍त 1100 मतांनी बाळूकाकांचा पराभव झाला. ज्ञानेश्‍वर पाटील (शिवसेना) हे आमदार म्‍हणून निवडून आले. बाळू काका नाराज झाले नाही. पुन्‍हा सामाजिक सेवेत झोकून दिले. जनतेची कामे करीतच राहिले. कार्यकर्त्‍यांच्‍या इच्‍छेखातर बाळूकाका पुन्‍हा 2005 मध्‍ये महादेव जानकार यांच्‍या ‘जनस्‍वराज्‍य’ पक्षाकडून विधानसभेला उभे राहिले. विजयाचे बिगुल वाजनारच होते. नियतीने घाला केला. बाळू काका 6000 मतांनी पडले. वडीलांची म्‍हणजेच महारुद बप्‍पा मोटे यांच्‍या पुण्‍याईमुळे राहुल मोटे निवडणूक जिंकले.
     जे लोक सत्‍तेत असताना एक साधा साखर कारखाना चालवू शकत नाहीत. गरीबांच्‍या हाताला कायमस्‍वरुपी काम मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करु शकत नाहीत. वडीलांच्‍या, पाहुण्‍यांच्‍या जिवावर लाल दिव्‍याच्‍या गाडीतून धुरळा उडवित फिरतात. निवडून आल्‍यानंतर मतदारांना दिलेल्‍या आश्‍वासनांची आठवणच नसते. त्‍यांना त्‍यांची जागा दाखवण्‍याची वेळ आता ह्या दुष्‍काळातून आल्‍याची चाहुल लागल्‍याचे चित्र दिसते. सत्‍ताधारी मंडळीवर गावा-गावात नाराजी दिसते. भैरवनार्थ शुगर हे जिल्‍हा बाह्य पार्सल आहे. पाण्‍याच्‍या टाक्‍या वाटून जनतेचे अश्रू पुसता येत नसतात तर ऊसाला हमी भाव द्यावा लागतो. उद्योगपती बोरकरान किर्तन, भजन कार्यक्रमाचे आयोजन करुन शिवशक्‍ती कारखान्‍याने शेतक-यांची केलेली फसवणूक जनता विसरणार नाही. सभा, संमेलने घेऊन रूग्‍णवाहिका देवून जनतेचे प्रश्‍न मिटतील का? असे एक ना अनेक प्रश्‍ने जनतेसमोर उभे आहेत. जनतेला काय हवय? हे ओळखणारा माणूस आता या मतदार संघाचे नेतृत्‍व करू शकतो. तेंव्‍हा दुष्‍काळाचे राजकारण करुन श्रेय लाटणा-या सर्व संधी साधू नेते राजकीय पक्षांना जनता आता येऊ घातलेल्‍या निवडणुकीतून आपली ताकद दाखवेल व बाळू काका सारख्‍या दुरदृष्‍टीच्‍या व समाज हितासाठी झटणा-या नेतृत्‍वाला सेवा करण्‍याची संधी सर्वसामान्‍य जनतेतून आगामी काळातून मिळणार आहे. अशीच आशिर्वादाची थाप बाळू काकांना भविष्‍यात भूम-परंडा-वाशी तालुक्‍यातील जनता देईल, या आत्‍मविश्‍वाने बाळू काका व त्‍यांचे अनेक सहकारी जनता जनार्धनासाठी करीत असलेल्‍या सामाजिक कार्याला क्रांतीकारी सलाम...!

संतोष बुरंगे
आसु ता. परंडा
 
Top