उस्‍मानाबाद -: बारावी परीक्षेत उस्मानाबाद जिल्ह्याने विभागात दुसरा क्रमांक पटकावत यंदा निकालात बाजी मारली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत उस्मानाबादचा टक्का वाढला असून निकाल ८३.२२ टक्के एवढा लागला. नांदेड जिल्हा मात्र यंदा विभागात तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला असून निकाल ८१.३१टक्के एवढा लागला आहे.
    फेब्रुवारी मार्च २0१३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेसाठी लातूर विभागातून लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यातील एकुण ६0 हजार ५२८ परिक्षार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ५९ हजार १४0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४९ हजार ४0४ विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण झाले. परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यापैकी ८१.३२ टक्के मुले व ८६.७५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. बारावी परिक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनी उत्तूंग यश संपादन केले असून विभागात यशाची परंपरा कायम राखण्यात मुलींना चांगले यश आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण ११९२३ विद्यार्थ्यांनी परिक्षाअर्ज भरले होते. यापैकी ११८४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील ९६९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८३.२२ टक्के एवढा लागला. गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्याचा बारावीचा निकाल ७४ टक्के लागला होता. त्या तुलनेत यावर्षीच्या निकालात वाढ झाली असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत भरीव यश मिळवले.
 
Top