ताज्या घडामोडी

ढोकी -: गोवर्धनवाडी (ता. उस्मानाबाद) येथील घरात बसले असताना शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकार यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
    आमदार राजेनिंबाळकर शुक्रवारी (दि. 24) दुपारी घरात थांबले होते. तेव्हा दुपारी 12.25 वाजता 9730993253 या क्रमांकावरून त्यांना कॉल करण्यात आला. 'तू घराच्या बाहेर ये, तुझ्या डोक्यात गोळी घालतो' असे म्हणून कॉल करणार्‍या व्यक्तीने त्यांना धमकावले. आमदार राजेनिंबाळकर सतर्क होऊन घराच्या बाहेर आले असता तेथे कोणीही आढळले नाही. त्यांनी परत याच क्रमांकावर कॉल लावला. संबंधित व्यक्तीने कॉल घेतला. मात्र, काहीही न बोलता मोबाइल बंद केला. यानंतर वारंवार आमदार राजेनिंबाळकर यांनी या क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, कॉल लागू शकला नाही. याप्रकरणी येथील ढोकी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ महिन्यांपूर्वीही आमदार राजेनिंबाळकर यांना धमकी देण्यात आली होती.
 
Top