उस्मानाबाद :- राज्य परिवहन महामंडळ, उस्मानाबाद यांनी कनिष्ठ पदासाठी एमकेसीएल, पुणे या संस्थेमार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर लेखी परीक्षेचा निकालही एमकेसीएल, पुणे या संस्थेच्या http://msrtc.mkcl.org आणि महामंडळाच्या  www.msrtc.gov.in  या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे. या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या वाहक, कनिष्ठ उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्र व शारिरीक तपासणीसाठी विभागीय तपासणी समितीसमोर दि.22 रोजी 60 उमेदवार, दि. 23 रोजी 60 उमेदवार व दि. 24 मे रोजी 42 असे एकुण 162 वाहक-कनिष्ठ उमेदवारांना सकाळी ठिक 8 वाजता राज्य परिवहन विभागीय कार्यालय, डॉ. आंबेडकर पुतळयाजवळ,उस्मानाबाद येथे बोलावण्यात आले आहे.
    पात्र उमेदवारांनी तपासणीसाठी येताना जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे  शैक्षणिक पात्रता, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, इयत्ता 10 वी (एसएससी) परीक्षा पास असल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आरटीओ प्राप्त केलेला वाहकाचा वैध परवाना व बिल्ला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन, राज्यस्तरीय खेळाडू असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला, सेवायोजन, समाज कल्याण कार्यालयात व इतर मान्यताप्राप्त संस्थेतील नोंदणी कार्ड क्रमांक आदिसह स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन विभाग नियंत्रक, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top