उस्मानाबाद -: राज्य परिवहन महामंडळाने लिपीक-टंकलेखक, कनिष्ठ पदासाठी एमकेसीएल, पुणे या संस्थेमार्फत लेखी परिक्षा घेण्यात आली आहे. या लेखी परिक्षेचा निकाल या संस्थेच्या http/msrtc.mkcl.orq आणि महामंडळाच्या www.msrtc.qov.in या वेबसाईटवर (संकेत स्थळावर) प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या लिपीक-टंकलेखक, कनिष्ठ उमेदवारांना कागदपत्र तपासणीसाठी विभागीय छाननी समितीसमोर दि. 10  मे 2013 रोजी सकाळी ठिक 8 वाजता राज्य परिवहन विभागीय कार्यालय,  डॉ. आंबेडकर पुतळयाजवळ, उस्मानाबाद येथे बोलाविण्यात आलेले आहे.
        उमेदवारांनी छाननीसाठी येतांना जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणिक पात्रता, शाळा सोडलेला दाखला, जातीचा दाखला, पदवी परीक्षा पास असल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, मराठी 30 शप्रमि, इंग्रजी 40 शप्रमि, संगणक- एमएससीआयटी हा कोर्स उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, अंशकालीन, राज्यस्तरीय खेळाडू असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला,  सेवायोजना, समाज कल्याण कार्यालयात व इतर मान्यताप्राप्त संस्थेमधील नोंदणी कार्ड क्रमांक आदींसह स्वखर्चाने हजर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top