उस्मानाबाद -: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद व जिल्हा क्रीडा परिषद, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2013-14 या वर्षातील सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सबज्युनिअर व ज्युनियर स्पर्धा 20 जून रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानबाद येथे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले-मुली यांचा या स्पर्धेत समावेश असणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी सहभाग घेऊन आपले संघ वेळेवर उपस्थित ठेवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजीव कुलकर्णी यांनी केले आहे.