उमरगा -: राज्य सहकारी बँकेने कर्जरूपात 25 कोटी रुपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारी झालेल्या शिखर बँकेच्या बैठकीत या कर्ज रकमेस शिखर बँकेच्या कार्यकारी संचालकांनी मंजुरी दिली आहे. यामुळे आर्थिक अडचणीतून सावरत असणार्या जिल्हा बँकेस मोठा आधार मिळणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शासकीय मदतीच्या अपेक्षेत असलेल्या जिल्हा बँकेस आजपर्यंत आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. एकीकडे शासकीय मदतीसाठी प्रयत्न सुरू असताना बँक पातळीवरही विविध माध्यमातून प्रय} सुरू होते. शासकीय मदतीबरोबरच जिल्हा बँकेने राज्य शिखर बँकेकडून येणे असणार्या 107 कोटी रुपयांच्या मागणीसाठीही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार सोमवारी जिल्हा बँकांना कर्ज देण्यासंदर्भात व इतर विषयावर निर्णय घेण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या अधिकारी, पदाधिकार्यांनी पैशाची मागणी लावून धरली. या मागणीला प्राथमिक पातळीवर यश आले असून शिखर बँकेच्या कार्यकारी संचालकांनी बँकेस 25 कोटी रुपये कर्ज स्वरुपात देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अडचणीत असणार्या जिल्हा बँकेस मोठा आधार मिळणार असून, येत्या दोन ते तीन दिवसांत याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेकडे सादर होण्याची शक्यता आहे. ही रक्कम मिळाल्यानंतर सध्या विविध शाखांमध्ये असणारी चलन तुटवड्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचे जिल्हा बँकेच्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचार्यांनी स्वागत केले आहे. याप्रकरणी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्य सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकांकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उस्मानाबाद दौर्यावर आल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निवेदन देऊन जिल्हा बँकेला कर्ज स्वरूपात मदत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी राज्य बँकेच्या कार्यकारी संचालकांना संपर्क साधून बँकेला तत्काळ आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले होते.