उस्मानाबाद : सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार वादळी वा-यासह मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. तर लोहारा तालुक्यात वादाळामुळे अनेकांच्या घरावरचे पत्रे उडुन गेल्याची चर्चा आहे. या जोरदार वा-यामुळे ढोकी-लातुर रोडच्या शेजारील अनेक झाडे उन्मळुन पडल्याने मार्गावरील वाहतुक बराच काळ ठप्प झाल्याची घटना सोमवार रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवार रोजी पावसाचे ठिकठिकाणी आगमन झाले. लोहारा तालुक्यात पावसाने आज जोरदार हजेरी लावली. लोहरा तालूक्यातील पाटोदा परिसरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरचे पत्रे उडुन गेले तर काही ठिकाणचे झाडेही उन्मळुन पडल्याचे वृत्त आहे. पंरडा शहर व परिसरात सांयकाळच्या सुमारास रिमझीम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतक-याच्या चेह-यावर समाधान झळकले असुन या पावसाने शेतक-यांना चांगलाच दिलासा दिला आहे.

उस्मानाबाद शहर परिसरात चांगलाच पाऊस झाला. सोमवार रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी परिसरात पावसाने चांगलाच दणका दिला. चारच्या सुमारास वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली. वा-याचा जोर अधिक असल्याने ढोकी-लातुर रोडवरील अनेक झाडे उन्मळुन रस्त्यावर पडल्याने रोडवरील वाहतुक बराच वेळ विस्कळीत झाली होती. जोरदार वा-यासह पाऊस असल्याने अनेक ठिकाणचे पत्रे उडुन गेल्याचेही समजते तसेच ढोकी परिसरातील कोंबडवाडी, कसबे तडवळे या गावासह इतरही गावात पावसाचा चांगलाच जोर होता. या पावसात ढोकी पासुन काही किलोमीटर आंतरावरील झाडे उन्मळुन पडली होती. रात्री उशीरापर्यंत या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. वाहतुक ठप्प झाल्यामुळे वाहनांच्या लांब रागा लागल्या होत्या. वाहतुक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करवा लागला. या पावसाने अनेकांच्या घरावरील पत्रे उडुन गेल्याने मोठे नुकसान झाले.
घटनास्थळी माजी मंत्री आ. राणाजगजीसिंह पाटील तसेच शिवसेनेचे आ. ओमराजे निंबाळकर यांनी भेट देवुन पाहणी केली. या पावसामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.
घटनास्थळी माजी मंत्री आ. राणाजगजीसिंह पाटील तसेच शिवसेनेचे आ. ओमराजे निंबाळकर यांनी भेट देवुन पाहणी केली. या पावसामुळे शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त होत आहे.