उस्मानाबाद -: अपंग आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृह यांच्यामार्फत सन 2013-14 या चालू वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. या केंद्रामार्फत पुढील अभ्यासक्रम आहेत. सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस.ऑफिस, किमान 8वी पास, सबमर्सिबल सिंगल फेज थ्री फेज अँन्ड आर्मेचर रिवायडींग 9 वी पास असून प्रत्येकी 25 जागा आहेत. एम.एस.सी.आय.टी. सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी -1 वर्षे असून फक्त अपंग मुलांनाच 25 जुलैपर्यंत प्रवेश दिला जाईल.
या केंद्रामार्फत खालील सोई व सवलती दिल्या जातात. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, संगणक कार्यशाळा, प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेटची सुविधा, तज्ञ निर्देशक तसेच समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसाय बीज भांडवल योजना.
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतीगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळयाजवळ, मिरज जि. सांगली-416410 दुरध्वनी क्र.0233-2222908-मोबाईल क्र. 9422496515,9881609940 आणि 9988577561असा आहे. वरील पत्यावर पोस्टाद्वारे प्रवेश अर्ज मोफत मिळतील.