उस्मानाबाद -: शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांचे अधिनस्त चालविण्यात येत असलेल्या अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा, गोलेगाव ता. भूम जि. उस्मानाबाद येथे 5 वी ते 9 वी या वर्गात किमान 40 विद्यार्थी याप्रमाणे सन 2013-14 या शैक्षणिक वर्षासाठी गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु असून शालेय विभागाने वरील शाळेत गुणपत्रकेसह रितसर अर्ज सादर करावा. प्रवेश पात्रता 4 थी ते 8 वी उर्तीर्ण असणे आवश्यक, विद्यार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि अपंग प्रवर्गातील असावा. त्यांच्या पालकांचे अनुसूचित जातीसाठी वार्षीक उत्पन 2 लाख तर इतर प्रवर्गासाठी 1 लाख रुपये असावे. या निवासी शाळेमध्ये विनामुलय भोजनाची व राहण्याची सोय, शालेय शैक्षणिक स्टेशनरी आणि शालेय क्रमिक पुस्तकाचा पुरवठाही केला जातो. विद्यार्थ्यांची निवड ही जातीच्या गुणवत्तेच्या निकषानुसार करण्यात येते. तरी वरील संवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज विनामुल्य घेऊन विहित कालावधीत भरुन देण्याचे आवाहन आर.एस.बंगले, मुख्याध्यापक, अनुसूचित जाती शासकीय मुलांची निवासी शाळा गोलेगाव ता.भूम जि. उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top