
गागील काही दिवसांत विवाह जुळजवणा-या संस्केतस्थळांचा नेटविश्वात चांगलाच बोलबाला निर्माण झाला आहे. मागील वर्षी या संकेतस्थळाची उलाढाल 510 कोटींच्या घरात पोहोचल्याचे दिसून आले. जगभरातील विवाहविषयक संकेतस्थळावर दर महिन्याला 20 लाखांपेक्षाही अधिक युजर्संच्या प्रोफाईल अपडेट होत असल्याचे दिसून आले. तसेच विवाहविषयक संकेतस्थळे चालविणा-या संस्था 50 ते 70 टक्के भरघोस नफा कमावतात. प्रत्यक्षात या संस्थांच्या माध्यमातून जुळविलेल्या विवाहांचे प्रमाण केवळ दहा टक्के आहे. त्यामुळे पारंपारिक पध्दतीने विवाह जुळविणा-या वधुवर सुचक मंडळाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.