सोलापूर - जागतिक वारसा म्हणून गौरवलेल्या आणि हिमालयाची राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दाजिर्लिंग (पश्चिम बंगाल) येथे झुकझुक करत धावणार्या टॉयट्रेनच्या खास डब्यांची बांधणी आणि सजावट होते कुडरुवाडीच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये! उंचच पर्वतरांगा, गर्द धुक्यांनी आच्छादलेला रम्य परिसर, वृक्ष वेलीवर पावसाच्या पाण्यांचे पसरलेले दवबिंदू, डोंगरदर्या, कडेला गर्द हिरवळ, कोणालाही भुरळ पाडतील अशा सौंदर्यानी नटला आहे, तो दाजिर्लिंग. निसर्गाने मुक्त हस्ते आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण येथे केली आहे. याची मजा अधिक चांगल्या पद्धतीने लुटता यावी म्हणून 4 जुलै 1880 मध्ये येथे टॉयट्रेन सुरू झाली. आजही या विशेष रेल्वेची धडधड सुरू आहे. देशातील लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण म्हणून देशी-विदेशी पर्यटकांची पसंती दाजिर्लिंगला आहे. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात. हमखास टॉयट्रेनचा आनंद लुटतात.
डबे बांधणी दर चार वर्षांनी
साधारणपणे टॉयट्रेनसाठी लागणार्या डब्यांची निर्मिती दर चार ते पाच वर्षांनी करण्यात येते. दोन वर्षांनी दुरुस्ती निघते. मोठय़ा ट्रेलरवर डबे ठेवून वर्कशॉपला पाठवले जातात. तयार डबे पाठवण्यासाठी हीच पद्धत अवलंबली जाते. कुडरुवाडी रेल्वेस्थानकासमोर हा वर्कशॉप आहे. एका डब्यात 46 आसन असतात. नॅरोगेजच्या रुळावरून धावते. आरामदायक खुच्र्या, पडदे, मोठय़ा काचेच्या खिडक्या, पंखे, विजेचे कनेक्शन, टॉयलेट आदींची निर्मिती येथे करण्यात येते. 2011 व 2012 मध्ये 4 नवे डबे तयार करण्यात आले. 2012 -13 मध्ये 27 डब्यांची दुरुस्ती करण्यात आली.

माथेरानची राणीही सजते येथेच
दाजिर्लिंगबरोबर माथेरान (जि. रायगड, महाराष्ट्र) येथे धावणार्या टॉयट्रेनच्या डब्यांची निमिर्तीदेखील कुडरुवाडी येथे करण्यात येते. 2011 व 12 मध्ये माथेरानच्या टॉयट्रेनसाठी येथून आठ नवे डबे तयार करून देण्यात आले. पाच डब्यांची देखभाल तर, चार डब्यांची दुरुस्ती दोन वर्षात कुडरुवाडी वर्कशॉपमध्ये झाली.
जागतिक वारशाचा दर्जा
डिझेल अथवा वाफेच्या इंजिनवर टॉयट्रेन धावते. याला दोन डबे जोडलेले असतात. दाजिर्लिंगच्या टॉय ट्रेनला 1999 मध्ये जागतिक वारशाचा (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा मिळाला आहे. त्यामुळे ही गाडी कायमस्वरूपी धडधडत राहणार आहे. भारतीय रेल्वेची शान उंचवत राहणार.
बॉलीवूडला आकर्षण
सत्तरच्या दशकात राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या आराधना सिनेमातील ‘मेरे सपनो की राणी कब आएगी तू’ हे गाणे याच टॉयट्रेनवर चित्रित करण्यात आले. तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रणबीर कपूर व प्रियंका चोप्रा यांच्या बर्फी चित्रपटात टॉयट्रेनचे दर्शन होते.
इतिहास जपण्याचे कार्य
जागतिक वारशाचा दर्जा लाभलेल्या टॉयट्रेनच्या डब्यांची निर्मिती कुडरुवाडी रेल्वे वर्कशॉपमध्ये करण्यात येते. ही केवळ सोलापूर विभागालाच नव्हे तर संपूर्ण मध्य रेल्वे विभागासाठी गौरवाची बाब आहे. कुर्डुवाडीच्या छोट्या वर्कशॉपमध्ये भारतीय रेल्वेचा इतिहास जपला जात आहे.’’ सुशील गायकवाड, विभागीय जनसंपर्क अधिकारी, सोलापूर रेल्वे.
प्रसाद कानडे
सौजन्य - दिव्यमराठी