उस्मानाबाद -: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जातीच्या मुलीच्या इयत्ता 5 वी ते 10 वीच्या वर्गाच्या शासकीय निवासी शाळा चालविल्या जातात. उस्मानाबाद जिल्हयात अनुसुचित जातीच्या मुलींची शासकीय निवासी शाळा, दर्गा रोड उस्मानाबाद येथे असून या निवासी शाळेत इयत्ता 5 वी ते 9 वीच्या वर्गातील प्रत्येक वर्गात किमान 40 विद्यार्थी या प्रमाणे सन 2013-14 या शैक्षणिक वर्षासाठी गुणवत्तेनुसार प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तरी इयत्ता 5 वी ते 9 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ  इच्छिणा-या विद्यार्थींनीनी सदर शासकीय निवासी शाळेमध्ये रितसर अर्ज गुणपत्रिकेसह सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
    शालेय विभागासाठी इयत्ता 4 थी, 5 वी, 6वी, 7 वी, 8 वी उर्त्तीण असणे आवश्यक आहे. विद्यार्थींनी अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जामी, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग, अपंग प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
 
Top