उस्मानाबाद -: आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणार्या व येणार्या वारकर्यांची सोय व्हावी, यासाठी उस्मानाबाद एसटी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाने वेगवेगळ्या सहा बसस्थानकांतून 15 ते 23 जुलैपर्यंत 130 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंढरपूरला जाणार्या व परत येणार्या वारकर्यांची सोय झाली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात आषाढी एकादशीला महत्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील सदस्य पंढरपूरची वारी नित्यनियमाने करतात. राज्याच्या काही भागात यावर्षी पावसाने बर्यापैकी साथ दिल्यामुळे आषाढी वारीला जाणार्या भाविकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक दिंडीमध्ये वारकर्यांची संख्या वाढली आहे. अनेक वारकरी पंढरपूरला दिंडीतून पायी जातात. तर बरेच वारकरी बस, खासगी वाहनांतून वारी करतात. यामुळे गेल्यावर्षी जिल्ह्यात एसटी महामंडळाने 100 जादा बस सोडल्या होत्या. दिंडीतून पायी गेलेले वारकरी दर्शन झाल्यानंतर परतीचा प्रवास बसद्वारे करतात, त्यामुळे परत येताना बसमध्ये गर्दी होते. याचा त्रास भाविकांना सहन करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करून यंदा एसटी महामंडळाने गतवर्षीपेक्षा 30 बसगाड्या वाढविल्या आहेत. यामुळे वारकर्यांना परतीचा प्रवास करणे सोयीस्कर झाले आहे. यासाठी एसटी महामंडळाने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी उस्मानाबाद, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब, परंडा या बसस्थानकांतून जादा बस मिळतील. बस सोडण्याच्या या नियोजनामुळे जिल्ह्यातील सर्व भागातील भाविकांची सोय होत आहे.

9 दिवस होणार 130 बसच्या फेर्या
जिल्ह्यातील सहा बसस्थानकांतून पंढरपूरसाठी जादा बसगाड्या सुटणार आहेत. यात उस्मानाबाद, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब, परंडा बसस्थानकांतून 15 ते 23 जुलैपर्यंत जादा बसच्या फेर्या सुरू होणार आहेत. भाविकांनी याचा लाभ घेऊन खासगी वाहनांतून प्रवास करण्याचे टाळावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.