उस्मानाबाद :- शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, चीड, उदासिनता, कमी व्हावी व त्यांच्या मनाची एकाग्रता वाढून त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, त्यांची मानसिक व बौध्दिक वाढ होण्यासाठी जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित, विनाअनुदानीत, आश्रमशाळा व इतर सर्व माध्यमांच्या शाळेतून इयत्ता 5 वी ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधना उपक्रम राबविण्यात येत आहे.
शाळेत नियमित दररोज परिपाठाच्यावेळी व शाळा संपण्यापूर्वी 10 मिनीटे विद्यार्थ्यांकडून आनापान साधना करुन घेण्यात येणार आहे. आनापान साधना म्हणजे स्वत:च्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रीय करुन मनावर नियंत्रण ठेवण्याचे साधन आहे. या उपक्रमास mitra (Mind in training for right awareness ) या नावानेही संबोधण्यात येते.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील काही निवडक शिक्षकांना मित्र उपक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षितांकडून केंद्र व शाळास्तरावर शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. शाळास्तरावर विद्यार्थ्यांसाठी नियमित आनापान साधनेची सुरुवात 15 जुलैपासून करण्यात येणार आहे. संबंधित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळास्तरावरुन या मेाहीमेचे महत्व लक्षात घेवून नियमित आनापान साधना सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांनी केले आहे.