उस्मानाबाद :- जिल्हा परिषदअंतर्गत ज्या नेांदणीकृत सुशिक्षित अभियंता व मजूर सहकारी संस्थाना आजपर्यंत काम मिळालेले नाही अथवा ज्यांनी 5 लाख रुपयांपर्यंत मर्यादा पुर्ण केलेली नाही,अशा नोंदणीकृत बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांना काम वाटप करण्याबाबतची बैठक 22 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचेसाठी सकाळी 11 वाजता तर मजूर सहकारी संस्थेसाठीची बैठक दु. 2 वा. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात येणार आहे.
तरी सर्व संबधितांनी उपरोक्त दिनांकास आपल्या नोंदणी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतिसह वेळेवर उपस्थित रहावे. तसेच स्वत: सुशिक्षित बेरोजगार अभियंता अभियंता व मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन किंवा सचिव यांनाच बैठकीत प्रवेश मिळेल. वाटप करावयाची कामाची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर लावण्यात आली असून काम वाटप करणे किंवा स्थगित ठेवणे याचे अधिकार जिल्हा परिषदेने राखून ठेवले आहेत, असे सदस्य काम वाटप समितीचे सचिव तथा कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.