उस्मानाबाद :- जिल्ह्यात चालू खरीप हंगामात 10 लाख 5 हजार 464 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली असून पेरणी कालावधी व पडणाऱ्या पावसाचा कालावधी विखुरल्याने सोयाबीन पिकावर खोड माशींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे तर  कांही ठिकाणी पाने गुंडाळणारी अळी, उंट अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. तेंव्हा शेतक-यांनी किटकांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस किंवा क्विनालफॉस 20 मीली  आणि निर्माक 1500 पीपीएम 30 मिली  10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेट्रोल  फवाऱ्यासाठी हे प्रमाण तीन पट करावे. पावसाळा चालू असल्यामुळे द्रावणात स्टीकरचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.   
 
Top