उस्मानाबाद :- मिटकॉन कन्सल्टन्सी ॲन्ड इंजीनिअरींग सर्व्हिसेस लि. उस्मानाबाद व जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबादच्यावतीने सर्वसाधारण/ विशेष घटक येाजनेअंतर्गत 18 ते 45 वर्षे या वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठीं मोफत संगणक टॅली प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी 20 जुलैपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणात उद्योगधंद्यात मदत करणाऱ्या शासकिय, निमशासकीय संस्था व त्यांच्या कर्ज योजनांची माहिती, उद्योजकीय गुण उद्योगाबददल माहिती, बाजारपेठ पाहणी, व्यक्तीमत्व विकास, प्रकल्प अहवाल तयार करणे, बाजारपेठेचे व्यवस्थापन व विक्री तंत्रज्ञान तसेच या क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ व्यक्तीमार्फत मार्गदर्शन केले जाईल.
यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुकांनी प्रवेशासाठी 20 जुलैपर्यंत जिल्हा उद्योग केंद्र मिटकॉन, उस्मानाबाद येथील कार्यक्रम समन्वयक रियाज शेख (भ्रमण ध्वनी क्र. 9028344270) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मिटकॉनचे मुख्य प्रशिक्षक व्ही. टी. चव्हाण (भ्रमणध्वनी क्रं 9423171340) आणि महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.