उस्मानाबाद :- कारगिल भागात 1999 मध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेले अतिक्रमण भारतीय शुर सैनिकांनी त्यांच्या साहसाने शत्र्रुला झुंज देवून परतावून लावले. या युध्दास 26 जुलै रोजी चौदा वर्ष पुर्ण होत आहेत. या युध्दात शहीद झालेल्या शुर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वानी कारगिल दिवस साजरा करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (मेजर नि.) सुभाष सासणे यांनी केले आहे.
नागरीकांनी हा विजय दिवस म्हणून आपल्या घरात/ दारात दिप/मेणपत्ती पज्वलित करुन रोषणाई करावी व कारगिल विजय दिवस म्हणून मोठया प्रमाणात साजरा करावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.