उस्मानाबाद :- जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागांतर्गत अंगणवाडी कार्यकर्तीमधून अंगणवाडी पर्यवेक्षिकांची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा 28 जुलै रोजी सकाळी 11 ते 12-30 या वेळेत जि. प. माध्‍यमिक व उच्च माध्यमिक कन्या प्रशाला, शहर पोलीस स्टेशनजवळ, उस्मानाबाद येथे आयोजित केली आहे.
            प्रवेशपत्राबाबत काही अडचण आल्यास उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्याशी  संपर्क साधावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक)  तथा  निवड समितीचे सदस्य सचिव एस.डी. पाटील  यांनी केले आहे.
 
Top