उस्मानाबाद :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद यांच्यावतीने उस्मानाबाद येथे सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी  दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन  प्रशिक्षण कार्यक्‌रम 25 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.  इच्छुक बेरोजगार युवक-युवतींनी अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक अर्चना माळी (भ्रमणध्वनी क्र. 9822671421)  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, व्दारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन एम.सी.ई.डी.चे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी पांडुरंग कांबळे यांनी केले आहे. 
           प्रशिक्षणात संपूर्ण दुग्ध व्यवसायाचे महत्व, गायीच्या जाती, चाऱ्यांचे नियेाजन, लसीकरण, दुधाचे पॅकिंग, दुधविक्री तसेच शेळीपालन, उस्मानाबादी शेळीचे महत्व, करडयाची निगा, शेळीचे लसीकरण, शेळीचे आहार व आजाराविषयी माहिती, अर्ध बंदिस्त व बंदिस्त शेडसची माहिती, शेळयांच्या वेगवेगळया जातींची माहिती व कुक्कुटपालनात गावरान व बॉयलर याविषयी माहिती तसेच त्यांच्या खाद्यांची व शेडसची, विमा, आजाराविषयीची माहिती यासह  उद्योजकीय अभ्यासक्रमाविषयी दररोज 12 ते सायंकाळी 5 या वेळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
          प्रशिक्षण कार्यक्‌रमात तज्ञ डॉक्टरांचे व यशस्वी उद्योजक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, संभाषण कौशल्य, प्रकल्प अहवाल, बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, शासकीय कर्ज प्रस्तावाची माहिती, अहिल्याबाई होळकर महामंडळाची  माहिती तसेच नाबार्ड आदिविषयी  माहिती दिली जाणार आहे.    
 
Top