उस्मानाबाद :- राज्य परिवहन प्राधिकरण यांनी ऑटोरिक्षा, टमटम, काळी पिवळी जीप या वाहनाचे परवाने नुतनीकरणासाठी कमाल 6 महिन्याची मुदत निश्चित केली आहे. यापैकी ज्या परवानाधारकांनी त्यांचे परवाने अद्यापपर्यत नुतनीकरण केले  नाहीत त्यांनी 30 ऑगस्टपुर्वी आपल्या वाहन परवान्याचे नुतनीकरण करुन घ्य्यावे,असे आवाहन  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी केले आहे. ज्या परवाना धारकांनी परवान्याचे नुतनीकरण केले नाही अशाविरुध्द ऑगस्ट महिन्यापासून तपासणी मोहिम राबविण्यात येणार असून ज्यांचे 6 महिने किंवा अधिक कालावधी झालेले परवाने असतील ते रदद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.त्यामुळे संबंधितांनी विहीत मुदतीत कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.               
 
Top