उस्मानाबाद :- कृषि विभागामार्फत विस्तार,आत्मा, राष्ट्रीय फलोतपादन अभियान या विविध योजनेअंतर्गत 535 गट स्थापन करण्यात आले. या  गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बांधावर खत व बियाणे वाटप करण्याची योजना राबविण्यात आली. या योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी एस. पी. जाधव यांनी दिली.
          उस्मानाबाद तालुक्यात 421 गटांमार्फत 4 हजार 490 मेट्रीक टन खताचे वाटप करण्यात आले. यामध्ये डी.ए.पी, युरिया, एम.ओ.पी., सिंगल सुपर फॉस्फेट, 12:32:16, 14:35:14 आदि ग्रेडचा समावेश असून 112 गावात  24 हजार 15 लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे. विविध गटातील 11 हजार 31 लाभार्थी  शेतकऱ्यांना 6 हजार 840 क्विंटल  बियाणे वाटप  करण्यात आले. यापुढेही शेतकऱ्यांना  खत व बियाण्याची गरज भासल्यास त्यांनी  विहीत प्रपत्रातील अर्ज संबंधित मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.                                                      
 
Top