उस्मानाबाद :- शासनाने खत, बियाणे  व युरीया खताचे दर निर्धारीत केले आहे. शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या किंमतीतच खत, बियाणाची  खरेदी करावी.  किंमतीपेक्षा जास्त दराने खरेदी करु नये, वाजवी पेक्षा जास्त दर दुकानदार आकारत असतील तर त्यांच्याविरोधात आपली तक्रार तालुकास्तरावर कृषि अधिकारी, पंचायत समिती किंवा तालुका कृषि अधिकारी, आणि जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नेांदवावी, किंवा टोल फ्री क्रमांक  18002334000 या क्रमांकावर तक्रार नेांदवावी,असे आवाहन कृषि विकास अधिकारी मदनलाल मिनीयार यांनी केले आहे.
        उस्मानाबाद जिल्हयासाठी  झुआरी कंपनीकडून सोलापूर रेल्वे रेकव्दारे 1 हजार  मेट्रीक टन युनिया खताचा पुरवठा उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यात झाला असून येत्या दोन दिवसात आर. सी. एफ. कंपनीकडून 2 हजार 500 मे. टन युरिया खताचा पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होणार  आहे.  युरिया खताची 50 किलो वजनाच्या  बॅगची किंमत 284 रुपये असून नीम कोटेड युरीयाची प्रतिबॅग किंमत 298 रुपये इतकी आहे. यापेक्षा जादा दराने शेतकऱ्यांनी युरिया खरेदी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
          कृषि विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात खत उपलब्ध होण्यासाइी कृषि सेवा केंद्र निहाय कृषी कर्मचाऱ्यांची  नियुक्ती केली आहे. त्यांच्यासमक्ष बियाणे व खते विक्री होत आहे.  खत व बियाणाची नियमानुसर विक्री होते किंवा नाही हे पाहण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.      
 
Top