उस्मानाबाद :- चालू खरीप हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांना बँकाकडून पीककर्ज मिळावे यासाठी आता सहकार विभाग आणि बँकांनी संयुक्त प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बँकांचे कर्ज थकीत आहे, त्याचे नुतनीकरण करण्यासंदर्भात आता प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी यासंदर्भात निर्देश दिले असून त्यानुसार तालुकानिहाय मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद शहर आणि नजीकच्या गावांसाठी उस्मानाबाद येथे 21 जुलै रोजी, परंडा येथेही 21 जुलै रोजी, कळंब आणि उमरगा येथे 22 जुलै, लोहारा, तुळजापूर आणि वाशी तालुक्यात 23 जुलै रोजी तर भूम येथे 25 जुलै रोजी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय, उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दि. 24 रोजी तेर व परिसरातील गावांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी त्या त्या कार्यक्षेत्रातील सर्व बँकांचे प्रतिनिधी, सहकार विभागाचे तालुका निबंधक आणि संबंधित गावांचे सहकार विभागाचे संपर्क अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत त्या कर्जाचे नुतनीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. जे शेतकरी असे नुतनीकरण करतील त्यांना तात्काळ नव्याने कर्ज वाटप करण्याचे बँक प्रतिनिधींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मान्य केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी बँक निहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतला. आतापर्यंत बँकांनी एकुण 58 टक्के कर्ज वाटप केले आहे. सर्वच बँकांनी उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा उपनिबंधक श्री.बडे यांनी बँका नवीन कर्ज मागणी अर्ज फेटाळत असल्याच्या अनेक तक्रारी करत असून यासंदर्भात वरीष्ठ बँक अधिकाऱ्यांनी संबंधित शाखा व्यवस्थापकांना सूचना दयाव्यात असे आवाहन केले.