उस्मानाबाद :- तुळजापूर विधानसभा मतदार संघातंर्गत तुळजापूर तालुक्यातील समाविष्ट गावांच्या मतदार यादीत मतदारांचे फोटो नसलेल्या मतदारांशी संपर्क साधून त्यांचे फोटो संकलनाचे काम सुरु आहे. याकामी गावोगावी यादी भागनिहाय मतदार केंद्रस्तरीय अधिकारी मागील तीन महिन्यापासून कार्यरत आहेत. वारंवार संपर्क साधूनही विवाह, नोकरी आदि कारणामुळे कायमस्वरुपी स्थलांतरीत झाल्याने त्या मतदारांचे फोटो संकलन होवू शकले नाही, अशा मतदारांना यापूर्वीच नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. अशा मतदारांची नावे ग्रामपंचायत व नगर पालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
तेव्हा तुळजापूर विधानसभा मतदार संघातील मतदारांनी 30 जुलैपुर्वी फोटो व रहिवासी दाखल्यासह संबधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे पुरावा सादर करावा वेळेत पुरावा सादर न केल्यास त्यांची नावे कायमस्वरुपी वगळली जाणार आहेत, असे आवाहन तुळजापूरचे तहसीलदार व्ही. एल. कोळी यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.