उस्मानाबाद :– उस्मानाबाद येथील न्यायाधिशांसाठी बांधण्यात येणाऱ्या अतिरिक्त 5 निवासस्थान इमारत बांधकामाचे भूमीपूजन आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश शशिकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे अध्यक्षस्थानी होते.
उस्मानाबाद येथील समता कॉलनीजवळ असणाऱ्या विसर्जन विहीरजवळ ही निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. याप्रसंगी न्या. कुलकणी्र यांनी ही बांधकामे लवकर पूर्ण होवून त्याचा लाभ येथे कार्यरत असणाऱ्या न्यायाधिशांना होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यकारी अभियंता देशपांडे यांनी येत्या जुनपर्यंत ही बांधकामे पूर्ण होतील असे सांगितले.
या कार्यक्रमास उस्मानाबाद विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. मिलिंद पाटील,जिल्हा सरकारी वकील व्ही.बी.शिंदे, सौ.कुलकर्णी यांच्यासह न्यायाधिश, वकीलवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधिश पी. बी. मोरे यांनी केले तर मुख्य न्यायदंडाधिकारी सी.पी.गड्डम यांनी आभार मानले.