कळंब -: उत्तराखंड येथील महाप्रलयातील आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कळंब (जि. उसमानाबाद) शहरातून मदतफेरी काढून सुमारे 22 हजार रुपयेचा निधी कार्यकर्त्यांनी जमविला. यावेळी मदतफेरीत सहभागी झालेल्या नेते व कार्यकर्त्यांनी प्रत्येक दुकान व घरात जाऊन मदत गोळा केली.
    यावेळी कार्यकर्त्यांनी नागरिकांकडून 22 हजार 825 रुपये मदत संकलित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा शाखेकडे ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. मदतफेरीमध्ये पक्षाचे तालुकाध्यक्ष रामहरी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब जाधवर, अशोक चव्हाण, विजेंद्र चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरबोले, नगरपालिकेचे गटनेते र्शीधर भवर, बालाजी अडसूळ, विकास कापसे, अरुण चौधरी, धनंजय वाघमारे, प्रशांत लोमटे, भागचंद बागरेचा, शरद रितापुरे आदी सहभागी झाले होते.
 
Top