उस्मानाबाद :- जिल्हयातील उमरगा,तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा या चार विधानसभा मतदार संघाच्या मतदान केंद्राचे सुसूत्रिकण करण्यात आले असून या मतदान केंद्राच्या सुसूत्रिकरणानुसार प्रारुप मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय याठिकाणी रितसर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रारुप मतदान केंद्रांच्या यादीबाबत कोणतेही आक्षेप असल्यास संबंधितानी दि. 23 जुलैपर्यंत ते दाखल करावेत, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. विहीत मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास दिनांक 7 ऑगस्ट,2013 रोजी या मतदान केंद्रांची यादी अंतिम समजली जाईल,असेही नमूद करण्यात आले आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार विधानसभा मतदार संघाच्या मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणाबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. दि. 8जुलै रोजी प्रारुप मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.