उस्मानाबाद :- जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधुन आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य जिल्हास्तरीय जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोगय समितीचे सभापती संजय पाटील दुधगांवकर यांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथून रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हाश्मी, डॉ. पांचाळ, जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.छंचुरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी,परिचारीका यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या रॅलीत नर्सींग विद्यालयासह शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कुल, शरद पवार हायस्कुल, जिल्हापरिषद कन्या प्रशाला, आर्यचाणक्य माध्यमिक विद्यालय आदि शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.