उस्मानाबाद : सलग दोन वर्षी जाणवलेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि नागरिकांनी लोकसहभागातून वृक्षलागवडीची मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी. जेणेकरुन दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. जिल्हाधिकारी डॅा. के.एम. नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, सलग दोन वर्षीच्या टंचाई परिस्थितीमुळे निर्माण झालेला पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न जिल्हा प्रशासनाने चांगल्या पद्धतीने हाताळला. कोरड्या पडलेल्या पाटबंधारे प्रकल्पातून लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविली गेली. यातून सुमारे १ कोटी २२ लाख घनमीटर गाळ उपसा झाला. यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा आणि परिसरातील सिंचन क्षमता वाढणार असल्याचे ते म्हणाले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना योग्य नियोजनाद्वारे खत व बियाणे वाटप करण्यात आले. त्यामुळे खताचा कोठेही तुटवडा जाणवला नाही, हे त्यांनी आवर्जून नमूद केले.
जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या उमरगा आणि कळंब येथील महसूल उपविभागीय कार्यालयांमुळे प्रशासकीय कामात गतीमानता येणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
त्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, पदाधिकारी, अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पुर्वमाध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृती परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेमधील गुणवंत विद्यार्थी तेजस भातांब्रेकर, किरण पवार, सकलेन पठाण, कुबेर आरळे व एन.टी.एस. परीक्षेतील यशाबद्दल प्रतीक चव्हाण या विद्यार्थ्याचा पालकमंत्री चव्हाण यांनी सत्कार केला.
या कार्यक्रमाला विविध भागातून आलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, जि. प. उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, नगराध्यक्ष रेविता बनसोडे, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी धनंजय सावंत, दगडू धावारे यांच्यासह विविध पदाधिकारी सद्स्य, अतिरिक्त जिल्हाधिकारी राम मिरासे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, तहसीलदार सुभाष काकडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक व पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हनमंत पडवळ यांनी केले.