उस्मानाबाद :- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया कमकुवत बेरोजगार उमेदवारांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत  बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक रमेश पवार यांनी केले आहे.
         स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील ज्या उमेदवारांच्या  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न शहरी भागासाठी 55 हजाराच्या आत तर ग्रामीण भागातील उमेदवारांचे वार्षिक उत्तपन्न 40 हजाराच्या आत असलेल्यांना या कर्ज योजनेचा लाभ,घेता येईल. बीजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत उमेदवारास 5 लाखापर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा असलेल्यांना अर्थसहाय्य मिळले. यात राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग 60 टक्क्के असून अर्जदारास 5 टक्के रक्कम स्वत:चा सहभाग म्हणून भरावा लागेल. बँकेनी मंजूर केलेल्या प्रकल्प रक्कमेच्या 35 टक्के रक्कम महामंडळामार्फत मंजूर करण्यात येते. महामंडळाकडील 35 टक्के रक्कमेला व्याजाचा दर दरसाल दरशेकडा 04 टक्के आकारण्यात येणार आहे.
           इच्छुक उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गर्शन केंद्र, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.     
 
Top