उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
          गुरुवार, दि. 22 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता सोलापूरहून अणदूर ता. तुळजापूर  येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार, दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता अणदूर येथून शासकीय विश्रामगृह, ता. तुळजापूरकडे प्रयाण. सकाळी 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथेआगमन व राखीव. दु.2  वा. तुळजापूर येथून मौ. सावरगांवकडे प्रयाण, दु. 2-30 वा. सावरगाव येथे आगमन व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करुन सोईनुसार अणदूरकडे प्रयाण. अणदूर येथे  आगमन, राखीव व मुक्काम.
          शनिवार, दि. 24 रोजी स. 10-15 वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण, सकाळी 10-45 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे  येथे आगमन व राखीव. स. 11 वा. स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित रथयात्रेस उपस्थित. स्थळ- लेाहिया मंगल कार्यालय, तुळजापूर, दु. 1 वा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयेाजित कार्यक्‌रमास उपस्थिती. स्थळ- त्रिमुर्ती मंगल कार्यालय, ता. तुळजापूर,  सोईनुसार तुळजापूरहून अणदूरकडे प्रयाण. आगमन राखीव व मुक्काम.
         रविवार,दि. 25 रोजी स. 10-30 वा. वैष्णोदेवी फ्रुड प्रोडक्टस प्रा. लि. इटकळ, येथे आगमन व स्नेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थिती.  दु. 12 वा. इटकळ येथून शासकीय वाहनाने तुळजापूरकडे प्रयाण, दु. 12-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वा. तुळजापूर येथून शासकीय वाहनाने अणदूरकडे प्रयाण, सायं.4-45 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. सायं. 6-30 वा. अणदूर येथून सोलापूरकडे प्रयाण.
 
Top