भारत हा कृषीप्रधान देश आहे. कारण भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तसेच भारतामध्ये शहरांपेक्षा खेडयांची संख्या जास्त असल्याने भारत हा खेडयांचा देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण जनतेची उपजीविका मुख्यत: शेतीवर चालते. परंतु लोकसंख्या वेगाने वाढत चालल्यामुळे शेतीव्यवसायावरच अवलंबून राहणे हळूहळू अशक्य होत चालले आहे. त्यामध्ये बागायती क्षेत्रापेक्षा निरायतीचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे भरतीय शेती ही निसर्गावरच अवलंबून आहे. प्रतिकुल परिस्थित म्हणजे निसर्गाने जर योग्य साथ दिली. तरीही ग्रामीण भागातील जनतेस रोजगारही उपलब्ध होत नाही. त्यातच वाढत्या औदयोगिकरणामुळे शहरात नौकरीची संधी उपलब्ध होऊ लागली आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण शहराकडे धाव घेत आहेत.
ग्रामीण भागातून शहराकडे बेरोजगार तरुण वर्ग जात असल्याने पाणी, निवारा, वाहतुक व्यवस्था तसेच आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू लागला व शहरामध्ये झोपडपटटीची बेसुमार वाढ होऊ लागली. हे सर्व थांबविण्यासाठी ग्रामीण भागात राहणा-या जनतेस रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सरकारने कमी भांडवल लागणारे व अवघड तंत्रज्ञानाची गरज नसणारे छोटे-छोटे व्यवसाय स्विकारले आहेत. त्यामध्ये हातकाम, कुक्कुटपालन, मधूपालिकापालन इत्यादीप्रमाणेच मत्स्यव्यवासायही स्विकारला आहे. मत्स्यव्यवसाय सुरु करण्यामार्गे ग्रामीण जनतेस त्यांच्याच भागात रोजगार उपलब्ध करुन देण्याचा विचार असला तरी मुख्य उददेश हा ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेस पोटभर सकस अन्न उपलब्ध करुन देणे, हा होय. कारण धान्य उत्पादनाची शेतीची क्षमता एका ठरावीक मर्यादेपर्यंत आहे व ती एकदा संपली की मग वाढती लोकसंख्या व तुटपुंजे अन्न यामध्ये असलेली तफावत भरुन काढण्यासाठी माणसास शेवटी पाण्याकडेच वळावे लागत आहे. त्यामधून मिळणा-या साधन संपत्तीचा जर योग्य त-हेने वापर केला गेला तर कितीही लोकसंख्या वाढली तरी कोणालाही अन्न कमी पडणार नाही, याची खत्री आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील जनतेस चांगल्या प्रतीचे अन्नही मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी अनेक भुकबळी जातात. त्या लोकांना कसे तरी पोट भरण्यासाठी अन्न मिळते. ते अन्न इतक्या निकृष्ट दर्जाचे असते की, कुपोषणामुळे दरवर्षी हजारो लोक व लहान मुले मृत्यूमुखी पडतात. जे लोक जगतात, त्यामध्ये बहुतेक कोणत्या ना कोणत्या तरी रोगाने पछाडलेली असतात.
लहान मुलांमध्ये तर मुडदूस व दृष्टीहीनता हे नेहमीस पाहावयास मिळते. या सर्व रोगाचे मुख्य कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचा आहार, आपल्या देशात नेहमीच बालकांची संख्या लाखाच्या वर आहे. त्यामागील कारण म्हणजे आहारामधून मिळणा-या "अ" जीवनसत्त्वाची कमतरता, असे जीवनसत्व, प्रथिनेयुक्त अन्न घेण ग्रामीण जनतेस परवडत नाही. तेंव्हा चांगल्या प्रतीचे अन्न त्यांच्याच कामात उपलब्ध व्हावे, या दृष्टीने जीवनसत्व, प्रथिने, खनिजे व इतर घटक असलेले अन्न म्हणजे दूध, मास, अंडी, पालेभाज्या इत्यादी होय. त्यापैकी दूध, मास व अंडी हे आर्थिकदृष्टा दुबर्ल असलेल्या ग्रामीण जनतेस परवडण्यासारखे नाही. तसेच शहरी भागाकडे या अन्नाचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागात हे अन्न उपलब्ध होत नाही. त्यामानाने मासे मात्र पाहीजे तेंवढया प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात व ते स्वस्तही असतात. म्हणून जेथे जेथे पाण्याचा साथा आहे. त्याचा योग्य त-हेने वापर करुन माश्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी उपयोग केला पाहीजे. मासा हा अन्न म्हणून अत्यंत चांगला आहे. कारण माश्यांच्या शरीरात पंधरा ते पंचवीस टक्के प्रथिने असतात तसेच जिवनसत्वे अ, ड हे मोठया प्रमाणात असतात. ब, क ही जीवनसत्वे काही प्रमाणात असतात. त्याचबरोबर एक ते दोन टक्के खनिजही असतात. मासे खाण्यासाठी चवदार तर असतातच तसेच पचविण्यासाठी अत्यंत हलके असतात. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना अत्यंत पौष्टीक व सुलभ रीतीने पचणारा आहार म्हणून मासे उपयोगी पडतात. मस्त्यव्यवसायामुळे ग्रामीण भागातील अन्नाची गरज तर भागतचे परंतु ग्रामीण बेकारीही काही प्रमाणात उपयोगी पडतात. मस्त्य व्यवसायामुळे ग्रामीण भागातील अन्नाची गरज तर भागतचे परंतु ग्रामीण बेकारीही काही प्रमाणात उपयोगी पडतात. मत्स्य व्यवसायामुळे ग्रामीण भागातील अन्नची गरज तर भागतेच. परंतु ग्रामीण बेकारीही काही प्रमाणात ग्रामीण अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाला दूहेरी महत्व आहे. भारतामध्ये कृषी हा मुख्य व्यवसाय असला तरी निसर्गाचा असमतोल व अन्नाची वाढत गरज लक्षात घेता, शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसायाकडे पाहीले जात आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी मत्स्यशेतीच्या माध्मातून एक उपजिविकेचे साधन म्हणून काम केले तर त्यांना आर्थिक फायदा तर होईलच परंतु भविष्यात स्वत:च्या पायावर उभे राहता येईल.

डॉ. दिपक जगदाळे