उस्मानाबाद :- जिल्ह्यातील भौगोलिक सीमांतर्गत असलेल्या सर्व आस्थापनांची संपूर्ण मोजणी करण्यासाठी येत्या 1 आक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत सहावी आर्थिक गणना सुरु होत आहे. यासाठी आस्थापनांची माहिती घेण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना सर्व नागरिकांनी सहकार्य करावे व आवश्यक ती सर्व माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहगणना आयुक्त डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले आहे.
केंद्र शासनातर्फे राष्ट्रव्यापी सहावी आर्थिक गणना घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियोजनासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. काळे, सहायक नियोजन अधिकारी श्री. आगावणे यांच्यासह आठही तालुक्यांचे तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते.
या गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी जावून कुटूंबांना भेट देऊन करण्यात येणार आहे. या गणनेच्या कामासाठी विविध स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आर्थिक गणनेच्या माहितीचा वापर हा नियोजनासाठी केला जातो. तसेच देशपातळीवर विविध क्षेत्रांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग कळावा यासाठी ही आकडेवारी गोळा करण्यात येणार आहे.
हंगामी व बारमाही पीके (लागवडी पिकांसह) घेणाऱ्या आस्थापना, शासकीय कार्यालये, शासनाने अनधिकृत ठरविलेल्या आस्थापना, आंतरराष्ट्रीय संस्था यांचा या गणनेत समावेश नाही. प्रत्येक प्रगणक हा जिल्ह्यातील प्रत्येक बांधकाम, इमारत, घर, किंवा कुटूंब यांना प्रत्यक्ष भेट देऊन ही माहिती गोळा करणार आहे. राज्यस्तरीय समितीकडून आलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यात आर्थिक गणनेचा कार्यक्रम विहित कालावधीत पूर्ण व्हावा यासाठी संनियंत्रण केले जाणार आहे.