उस्मानाबाद :- माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2013 मध्ये मुदती संपणा-या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या स्वतंत्र ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेला आहे. त्यानुसार संबंधित तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यासाठी संबंधित तालुक्यांच्या पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी हे आचारसंहिता प्रमुख असणार आहेत. जिल्हाधिकारी डा. के.एम. नागरगोजे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार तुळजापूर, उमरगा, कळंब आणि परंडा येथील गटविकास अधिकारी हे त्या-त्या तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता प्रमुख राहतील.