उस्मानाबाद -: स्वर्ण जयंती ग्रामरोजगार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दारिद्रयरेषेखालील अति उत्कृष्ट सक्षम स्वयं सहायता गटासाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार शासनमार्फत दिला जातो. यासाठी गुणांकनाची पध्दत अवलंबून व निगडीत निकषानुसार विचार करुन सन 2012-13 या वर्षासाठी तालुका व जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय परितोषिकासाठी जिल्हास्तरीय समिती मार्फत निवड करण्यात येते. यासाठी दारिद्रयरेषेखालील उत्कृष्ठ बचत गटांनी आपले प्रस्ताव दि. 30 सप्टेंबर पर्यंत संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे पाठविणे आवश्यक आहे.
तालुका व जिल्हा व विभागीय पातळीवरील निवडीसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या गटास पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच बचत गटावर वर्तमानपत्रामध्ये उत्कृष्ट लेख लिहिणारे व बचत गटांच्या कार्याची वेळोवेळी चांगली प्रसिध्दी देणा-या पत्रकारांना सुध्दा पुरस्कार देण्यात येतो.
वरील गटाचे प्रस्ताव विभागीयस्तरावरील निवडीसाठी 14 ऑक्टोंबर रोजी पाठविण्यात येणार असल्याचे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.