उस्मानाबाद :- सप्टेंबर/ऑक्टोबर मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत इयत्ता 10 वी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र व प्रात्यक्षिक /तोंडी परीक्षेचे साहित्याचे वाटप येथील जिल्हा परिषदेच्या (कन्या) प्रशालेत दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत वितरण केंद्रावर करण्यात येणार आहे.
सर्व शाळांनी आपल्या प्रतिनिधीस सही शिक्क्यासह प्रवेशपत्रे व इतर साहित्य स्वीकारण्यासाठी पाठवावे, असे आवाहन विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभाग यांनी केले आहे.
सर्व शाळांनी आपल्या प्रतिनिधीस सही शिक्क्यासह प्रवेशपत्रे व इतर साहित्य स्वीकारण्यासाठी पाठवावे, असे आवाहन विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभाग यांनी केले आहे.