उस्‍मानाबाद :- येत्या 9 सप्टेंबर रोजी राज्यात गणेशोत्सव सुरु होणार असून सध्या फल्युचे वाढते प्रमाण लक्षात घेता स्वाईन फल्यु प्रतिबंध व नियंत्रणासाठी जनतेनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे यांनी केले आहे.
    फ्ल्यूची लक्षणे- ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी. अशी लक्षणे दिसून आल्यास गर्दीत जाणे टाळावे, जनसंपर्क टाळावेत, गणेशोत्सवाच्या गर्दीत सहभागी होवू नका, सामान्य वाढणारा ताप, सर्दी, खोकला अंगावर काढू नका, उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, मधुमेह, हृदयरोग अथवा इतर जुनाट आजार असलेल्या व्यक्तींनी तसेच गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी.
    इन्फ्ल्यूएंझा ए एच 1 एन 1 टाळण्यासाठी- वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा, पौष्टीक आहार घ्या, लिंबू,आवळा, मोसंगी, संत्री , हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात समावेश करावा. धुम्रपान टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. भरपूर पाणी प्या. शिंकताना, खोकतांना नाकातोंडावर रुमाल किंवा टिश्यु पेपर ठेवा. टिश्यु पेपरची कचराकुंडीत व्यवस्थित विल्हेवाट लावा. इतरत्र ते टाकु नका.
    इन्फ्ल्यएंझा ए एच 1 एन 1 टाळण्यासाठी हे करु नका- हस्तांदोलन, सार्वजनिक टिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेवू नका. आपल्याला फ्ल्यूसदृश  लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जावू नका, असा सल्लाही डॉ. धाकतोडे यांनी दिला आहे.
 
Top