उस्मानाबाद -: अपंग व्यक्तींना देण्यात येणा-या राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्र  शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागाने सन 2013 च्या पुरस्कारासाठीचे अर्ज मागविलेले आहेत.  या अर्जामधुनच महाराष्ट्र राज्याच्या  सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणा-या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी अपंग व्यक्तीच्या  विविध प्रवर्गातून अर्ज मागविण्यात आले आहे. केंद्र  शासनाकडून देण्यात येणा-या पुरस्कार योजनेचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
    उत्कृष्ट कर्मचारी - स्वयंम उद्योजक अपंग व्यक्ती,उत्कृष्ट नियुक्ती अधिकारी आणि सेवायोजना अधिकारी/संस्था,अपंग व्यक्तीसाठी कार्य करणा-या उत्कृष्ट व्यक्ती व उत्कृष्ट संस्था, प्रतीय यश व्यक्ती,अपंग व्यक्तीचे जिवन सुधारणेच्या उद्देशाने केले उत्कृष्ट संशोधन/उत्पादन/निर्मिती ,अडथळाविरहीत निर्मिती करणारी संस्था,अपंग व्यक्तीना पुनर्वसन सेवा पुरविणारा उत्कृष्ट जिल्हा,राष्ट्रीय अपंग वित्त व विकास  महामंडळाचे कार्यकरणारी राज्य यंत्रणा,उत्कृष्ट कार्यकरणा-या प्रौढ अपंग व्यक्ती ,उत्कृष्ट कार्यकरणारे अपंग बालक,उत्कृष्ट ब्रेलखाना,उत्कृष्ट सहजसाध्य संकेतस्थळ,अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी प्रोत्साहीत करणारे उत्कृष्ट राज्य, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी अपंग व्यक्ती.
अर्जासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विभागाच्या  www.socialjustice.nic.in  या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
      ज्या अपंग व्यक्ती/संस्था/उद्योजक यांना 2013 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळणेसाठी अर्ज करावयाचे आहे.अशा व्यक्तीनी 13 सप्टेंबर, 2013 पर्यंत विहीत नमुन्यातील परिपुर्ण अर्ज 4 प्रतीत भरुन योग्य त्या कागदपत्रासह जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे सादर करण्यात  यावेत, विलंबाने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी के.बी. गायकवाड,जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.           
 
Top