उस्मानाबाद -: अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या उस्मानाबाद शाखेच्यावतीने दि. 15 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्हयातील कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा संकुल येथे सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती नाटय परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी दिली आहे.
या मेळाव्याचे उदघाटन अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष तथा सिनेअभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, भिम कायदा सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, उपजिल्हाधिकारी करमकर, जिल्हा क्रिडा अधिकारी अनिल देशपांडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये कलांवंतासंबंधी असणारे प्रश्न व त्यांच्या मागण्या सोडण्यात येणार आहेत. कलावंतांना दरमहा वेतन चालू करणे, त्यांच्या पाल्यांना शिक्षण शुल्कात सवलत देणे, कलावंतांना घरकुल योजनेत प्राधान्य, अ.भा. नाटय परिषदेच्या सदस्यांना मानधन समितीमध्ये विचारात घेणे, कलावंतांना एसटी बस / रेल्वे पासमध्ये सवलत देणे आदी मागण्या या मेळाव्याद्वारे राज्य सरकारला करण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद जिल्हयातील सर्व कलावंतांनी मोठया संख्येनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाटय परिषदेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, सागर चव्हाण, शशिकांत माने, सतीश ओव्हाळ, सुशांत माने आदींनी केले आहे.