उमरगा : लोहारा व उमरगा या तालुक्याच्या ठिकाणी धान्य गोदाम बांधण्याकरिता अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने तीन कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याची माहिती शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
उमरगा व लोहारा येथील सध्याचे धान्य साठविण्याचे गोदाम 1960 च्या दशकात बांधलेले आहे. या गोदामाची दुरवस्था झाल्याने धान्य ठेवण्याच्या दृष्टीने ते असुरक्षित व धोकादायक बनले होते. तसेच उमरगा येथे 500 व 200 मेट्रिक टन धान्य साठविण्याचे प्रत्येकी एक व लोहारा येथे 500 मेट्रिक टन क्षमतेचे एक गोदाम आहे. मात्र, मिळणार्या धान्याच्या तुलनेत हे गोदाम अपुरे पडत असल्याने बरेचसे धान्य बाहेर ठेवल्याने नासाडी होत होती. या सर्व बाबींची दखल घेऊन शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा व लोहारा येथे धान्य गोदामाच्या नवीन इमारतींची मागणी करून यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. 13 जून रोजी अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन, लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्याअनुषंगाने उमरगा येथे तीन हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम इमारतीसाठी एक कोटी 92 लाख व लोहारा येथे 1800 मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासाठी एक कोटी 31 लाख रुपये इतक्या निधीच्या कामास प्रशासकीय मान्यता दिल्याचे नामदार अनिल देशमुख यांनी लेखी पत्राद्वारे आमदार चौगुले यांना कळविले आहे.