उस्मानाबाद :- दुरध्वनीधारकांचे अडीअडचणी व प्रलंबित वैयक्तिक तक्रारीचे निपटारा करण्यासाठी बी.एस.एन.एल तर्फे तक्रारीचे निवारण करण्याठी उस्मानाबाद येथील सांजारोड, बी.एस.एन.एल च्या प्रशासनिक भवनात सोमवार दि 30 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता टेलिफोन अदालत आयोजित करण्यात आले आहे.
           दुरध्वनी जोडणीस होणारा / झालेला  विलंब, साहित्य देण्यास विलंब, जास्तीचे देयक, प्रलंबित देयके, दुरध्वनी सेवेबाबतच्या असलेल्या तक्रारीचे निवारण या टेलिफोन अदालतीमध्ये करण्यात येणार आहे. संबधितांनी आपल्या तक्रारी तीन महिन्यापासून प्रलंबित तक्रारी लेखी स्वरुपात दि. 28 सप्टेंबरपर्यंत आपले नाव, टेलिफोन नंबर ,पत्यासह टेलिफोन अदालत के लिए असा उल्लेख करुन तक्रार पाठवावेत, असे आवाहन उपमंडळ अभियंता (वाणिज्य,) बी. एस. एन. एल. सांजा रोड, उस्मानाबाद या पत्यावर पाठवावेत.            
 
Top