उस्मानाबाद :- सामाजिक न्याय विभागातर्फे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, विमुक्ती जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेतून अदा केली जाते. सन 2013-14 या वर्षापासून अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, सावित्रिबाई फुले शिष्यवृत्ती ई स्कॉलरशिप योजनेत समावेश करण्यात आला आहे.
जिल्हयातील अनेक शाळेकडून मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्याचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, सावित्रिबाई फुले शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकावर राहील, याची नोंद संबधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.