उस्मानाबाद :- रब्बी हंगामात शेतक-यांना कृषी निवीष्ठा खते, बियाणे व किटकनाशके याविषयी  असलेल्या अडचणी सोडवून त्यांना मार्गदर्शनासाठी जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी व तालुकास्तरावर संबधित तालुक्याचे गट विकास अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची  स्थापन करण्यात आली आहे, शेतक-यांनी आपल्या तक्रारी संबधित तालुक्याच्या तक्रार निवारण कक्षाकडे सादर करावीत, असे आवाहन कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
          तक्रार निवारण कक्षाचे ठिकाण व दुरध्वनी संपर्क क्रमांक यानुसार आहेत. कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद 02472-223794, गटविकास अधिकारी, उस्मानाबाद 02472-222157, गट विकास अधिकारी, उमरगा-02475-252027, गटविकास अधिकारी, लोहारा- 02475-266579, गटविकास अधिकारी, तुळजापूर-02471-242040, गट विकास अधिकारी, भुम- 02478-272028, गट विकास अधिकारी, परंडा-02477-232028, गट विकास अधिकारी, वाशी-02478-276900 आणि गटविकास अधिकारी, कळंब,2473-262225 असा आहे.
           सदरील तक्रार निवारण कक्ष सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यत कार्यान्वित राहील. तसेच तक्रारीबाबत  कृषि  विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 या सेवेचा लाभ घ्यावा, असे  आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
 
Top